बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यात आज 140 रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी, वाचा किती नव्या रूग्णांची झालीये नोंद…

पुणे | शहरातील कोरोनाबाधितांची संख्या कमी व्हावी, यासाठी शासन आणि प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. मात्र शहरातील रूग्णसंख्या कमी होताना दिसून येत नाहीये. पुण्यात आज दिवसभरात 246 रूग्णांची नव्याने नोंद झाली आहे.

आज 2044 जणांच्या घशाचे स्त्राव चेकअपसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी 246 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे आता पुण्याची एकूण रूग्णसंख्या 5427 वर पोहचली आहे.

पुण्यात आता अ‌ॅक्टीव्ह रूग्णसंख्या 2279 एवढी आहे. तर आज दिवसरात 140 कोरोनाबाधित रूग्ण उपचारानंतर ठणठणीत होऊन घरी गेलेले आहेत. तर दुर्देवाने आज 09 कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

पुण्यात 176 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 44 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

विमानातून आलेल्या ‘भावा’ला सन्मानाने पाठवलं, आम्ही अजून काय करायला हवं?- शाहिद आफ्रिदी

भाजपमधील माणसं सत्तेसाठी हपापलेली आहेत- पृथ्वीराज चव्हाण

महत्वाच्या बातम्या-

“ठाकरे सरकारला फडणवीसांच्या सल्ल्याची गरज नाही, त्यासाठी त्यांनी एखादी कंपनी उघडावी”

देवेंद्र फडणवीस यांचं ‘ते’ वक्तव्य धादांत खोटं; गृहमंत्री अनिल देशमुखांचा पलटवार

आनंदाची बातमी… पुण्यात कोरोनाबाधित महिलेने दिला कोरोनामुक्त बाळाला जन्म!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More