बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यासाठी गूडन्यूज… कोरोना रूग्णांच्या संख्येत मोठी घट तर डिस्चार्ज देखील मोठ्या प्रमाणावर

पुणे  |   गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यात कोरोना संसर्गाचा प्रसार मोठ्या झपाट्याने होत आहे. नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाग्रस्तांचं प्रमाण देखील मोठं आहे. परंतू आता राज्य शासनाच्या मदतीने महानगरपालिका प्रशासनला कोरोना रूग्णसंख्या घटवण्यात यश आलं आहे. आज कोरोनाच्या नव्याने सापडलेल्या रूगणसंख्येत कमालीची घट पाहायला मिळाली आहे. विषेष म्हणजे टेस्टिंग वाढूनही नव्याने नोंद झालेले रूग्ण कमी आहेत. पुणेकरांसाठी सुटकेचा निश्वास सोडणारी बातमी आहे.

पुण्यात आज दिवसभरात 108 रूग्णांची नव्याने नोंद झाली आहे. आज 1200 जणांच्या घशाचे स्त्राव चेकअपसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी 108 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे आता पुण्याची एकूण रूग्णसंख्या 6201 वर पोहचली आहे.

पुण्यात आता अ‌ॅक्टीव्ह रूग्णसंख्या 2248 एवढी आहे. तर आज दिवसरात 194 कोरोनाबाधित रूग्ण उपचारानंतर ठणठणीत होऊन घरी गेलेले आहेत. तर दुर्देवाने आज 08 कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, पुण्यात 170 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 43 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

देशातील ‘या’ झोन्समध्ये लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढवला; केंद्र सरकारकडून नियमावली जारी

केंद्र सरकारच्या नव्या गाईडलाईन्सनूसार काय बंद राहणार, काय उघडणार?

महत्वाच्या बातम्या-

3 टप्प्यात खुले होणार व्यवहार; कोणत्या टप्प्यात काय आणि कधी सुरु होणार? वाचा…

उद्धवजी माझ्या मोठ्या भावासारखे आहेत त्यामुळे मी त्यांना…-देवेंद्र फडणवीस

ठाकरे सरकार कुठे कमी पडतंय?, देवेंद्र फडणवीस म्हणतात…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More