बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

पुणे | पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. तर डिस्चार्ज देण्यात येणाऱ्या रूग्णांची संख्या देखील जास्त आहे. आनंदाची बाब म्हणजे आज पुण्यात नव्या रूग्णांची नोंद कमी अन् डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे. राज्य सरकारने केलेल्या लॉकडाऊनचा फायदा झाला असल्याचं या कमी झालेल्या संख्येवरून दिसत आहे.

पुण्यात आज दिवसभरात 199 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 225 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 3 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 4,98,667 इतकी आहे. तर पुण्यात ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

आत्तापर्यंत एकूण 8986 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजपर्यंत 4,87,823 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 7973 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमागे दररोज नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यादृष्टीने पुणे महानगरपालिका प्रशासनाने कडक पावलं उचललीत. त्यामुळे ही कमी झालेली आकडेवारी अशाच प्रकारे आणखी कमी व्हायला हवी.

थोडक्यात बातम्या

डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या प्रकरणात न्यायालयाने दिला ‘हा’ मोठा निकाल

‘आता तरी सरकारनं जागं व्हावं’; खासदार संभाजीराजेंचं मुख्यमंत्र्यांना आवाहन

कोरोना अपडेट! मुंबईची आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात वाढ, वाचा आजची आकडेवारी

…अन् त्या दिवशी माझा क्रिकेटमधील इंटरेस्टच संपला; आव्हाडांनी घेतली गावस्करांची फिरकी

सोनं-चांदी खरेदी करण्याआधी इथे तपासा लेटेस्ट भाव एका क्लिकवर, आजही दरात घसरण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More