बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

पुणे | पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये घट होत आहे. तर डिस्चार्ज देण्यात येणाऱ्या रूग्णांची संख्या देखील जास्त आहे. आनंदाची बाब म्हणजे आज पुण्यात नव्या रूग्णांची नोंद कमी अन् डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे. राज्य सरकारने केलेल्या लॉकडाऊनचा फायदा झाला असल्याचं या कमी झालेल्या संख्येवरून दिसत आहे.

पुण्यात आज दिवसभरात 185 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 138 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 3 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 5,10,26 इतकी आहे. तर पुण्यात ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

आत्तापर्यंत एकूण 9029 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजपर्यंत 4,90,510 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 7841 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमागे दररोज नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यादृष्टीने पुणे महानगरपालिका प्रशासनाने कडक पावलं उचललीत. त्यामुळे ही कमी झालेली आकडेवारी अशाच प्रकारे आणखी कमी व्हायला हवी.

थोडक्यात बातम्या- 

‘केंद्र सरकारने महाराष्ट्राला…’; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केंद्राला केली ‘ही’ विनंती!

बाबो! ‘मनिके मागे हिते’ गाणं गातानाचा रानू मंडलचा व्हिडीओ नेटकऱ्यांना घालतोय भुरळ, पाहा व्हिडीओ

…तरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मला पालकमंत्रिपदावरून हटवतील- छगन भुजबळ

मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर भाजप प्रवेशाबाबत अमरिंदर सिंग यांनी सोडलं मौन; म्हणाले…

आर. आर. पाटलांच्या बंधूंचा आईसोबतच्या व्हायरल फोटोमागील कारण ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More