पुणे | पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये घट होत आहे. तर डिस्चार्ज देण्यात येणाऱ्या रूग्णांची संख्या देखील जास्त आहे. आनंदाची बाब म्हणजे आज पुण्यात नव्या रूग्णांची नोंद कमी अन् डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे. राज्य सरकारने केलेल्या लॉकडाऊनचा फायदा झाला असल्याचं या कमी झालेल्या संख्येवरून दिसत आहे.
पुण्यात आज दिवसभरात 70 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 122 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 2 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 5,03,245 इतकी आहे. तर पुण्यात 4,630 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
आत्तापर्यंत एकूण 9,065 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आज 4,675जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांमागे दररोज नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यादृष्टीने पुणे महानगरपालिका प्रशासनाने कडक पावलं उचललीत. त्यामुळे ही कमी झालेली आकडेवारी अशाच प्रकारे आणखी कमी व्हायला हवी.
थोडक्यात बातम्या-
राज्याच्या कोरोना आकडेवारीत चढ-उतार, वाचा आजची ताजी आकडेवारी
“वीर सावरकरांच्या नावानं राजकारण आणि आज सत्तेसाठी आंधळेपणा”
ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! निर्बंधांमधून शिथिलता देण्यासाठी दिले ‘हे’ निर्देश
अबब! 2 वेळा विश्वचषक जिंकून देणाऱ्या ‘या’ कर्णधाराने नाकारली भारतीय प्रशिक्षकपदाची ऑफर
आजची शिवसेना पूर्णपणे उपऱ्यांची; प्रविण दरेकरांचं संजय राऊतांना सडेतोड प्रत्युत्तर
Comments are closed.