बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुणे कोरोना अपडेट! जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

पुणे | महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. परंतु, आता महाराष्ट्रात डेल्टा प्लस या कोरोनाच्या नव्या विषाणूने डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. त्यातच आज पुण्यातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

पुणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज दिवसभरात 294 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच 347 रुग्ण कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी परतले आहेत. गेल्या काही दिवसात पुण्यातील कोरोना आटोक्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या पुण्यात 224 गंभीर रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, पुणे महापालिका क्षेत्रात सध्या 2 हजार 488 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज दिवसभरात 7 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत 8 हजार 749 रुग्णांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

एकूण 04 लाख 86 हजार 365 कोरोनाबाधित रुग्णांपैकी 04 लाख 75 हजार 128 रुग्ण आत्तापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच आज 07 हजार 930 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या-

कौतुकास्पद! मराठमोळ्या अभिनेत्रीची पुरग्रस्तांना तब्बल 10 कोटींची मदत

पुणे हादरलं! दत्ता फुगेंच्या मुलाच्या कानशिलात लगावल्याचा राग, तरुणाची हत्या

…म्हणून मी रुग्णालयात दाखल झालो होतो; जयंत पाटलांचं स्पष्टीकरण

पुढच्या निवडणुकीत मोदी विरूद्ध भारत असेल- ममता बॅनर्जी

राज्य सरकारचा मोठा निर्णय! खासगी शाळांच्या फीमध्ये 15 टक्के कपात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More