बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुणे कोरोना अपडेट! जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

पुणे | महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. परंतु, आता महाराष्ट्रात डेल्टा प्लस या कोरोनाच्या नव्या विषाणूने डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. त्यातच आज पुण्यातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

पुणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज दिवसभरात 316 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच 329 रुग्ण कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी परतले आहेत. गेल्या काही दिवसात पुण्यातील कोरोना आटोक्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या पुण्यात 297 गंभीर रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, पुणे महापालिका क्षेत्रात सध्या 2 हजार 783 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज दिवसभरात 6 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत 8 हजार 612 रुग्णांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. डेल्टा प्लस या नव्या विषाणूमुळे सध्या पुणे शहरात पुन्हा एकदा निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

एकूण 04 लाख 79 हजार 732 कोरोनाबाधित रुग्णांपैकी 04 लाख 68 हजार 337 रुग्ण आत्तापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच आज 05 हजार 734 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या

 

 

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More