बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शाब्बास पुणेकरांनो! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्याने अखेर करुन दाखवलं, वाचा आजची आकडेवारी

पुणे |  भारतात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने पुण्यात देखील धुमाकूळ घातला होता. पुणे शहर कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलं होतं. मात्र, याच पुण्यात आता कोरोनाबाधितांची संख्या प्रचंड कमी झाली आहे. राज्य सरकारने केलेल्या लॉकडाऊनचा फायदा झाला असल्याचं या कमी झालेल्या संख्येवरून दिसत आहे.

पुण्यात आज दिवसभरात 331 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 253 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 13 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे. यामध्ये 05 जण पुण्याबाहेरील होते.

पुण्यात सध्या 244 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 4,80,913 इतकी आहे. तर पुण्यात 2941 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 8636 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 4,69,336 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 6.99 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी दररोज नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यादृष्टीने पुणे महानगरपालिका प्रशासनाने कडक पावलं उचललीत. त्यामुळे ही रूग्णसंख्या घटली.

थोडक्यात बातम्या-

“नागपूरचा विकास पहिल्या पावसात भिजून गेला”

“केंद्रातील मंत्रीच नाही तर पंतप्रधान मोदींनाही बदलण्याची गरज”

बाॅलिवूडवर पून्हा शोककळा! हाॅरर चित्रपटांचे निर्माते कुमार रामसे यांचं निधन

‘शिवसेना नेहमीच निवडणुकीसाठी तयार असते’; शिवसेनेच्या बड्या नेत्याची गर्जना

“सामाजिक स्पर्धा आणि माझी परीक्षा”; MPSC विद्यार्थिनीने लिहिलेला हा वास्तवदर्शी लेख नक्की वाचा!

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More