बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शाब्बास पुणेकरांनो! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्याने अखेर करुन दाखवलं, वाचा आजची आकडेवारी

पुणे | भारतात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने पुण्यात देखील धुमाकूळ घातला होता. पुणे शहर कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलं होतं. मात्र, याच पुण्यात आता कोरोनाबाधितांची संख्या प्रचंड कमी झाली आहे. राज्य सरकारने केलेल्या लॉकडाऊनचा फायदा झाला असल्याचं या कमी झालेल्या संख्येवरून दिसत आहे.

पुण्यात आज दिवसभरात 276 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 310 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 12 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे. यामध्ये 06 जण पुण्याबाहेरील होते.

पुण्यात सध्या 229 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 4,84,356 इतकी आहे. तर पुण्यात 2815 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 8702 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 4,72,839 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 7187 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी दररोज नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यादृष्टीने पुणे महानगरपालिका प्रशासनाने कडक पावलं उचललीत. त्यामुळे ही रूग्णसंख्या घटली.

थोडक्यात बातम्या- 

राज कुंद्राच्या समर्थनार्थ उतरली गहना; एकता कपूरचं नाव घेत म्हणाली…

अभिनेत्रींना ‘हे’ आश्वासन देऊन करुन घ्यायचे बोल्ड सीन्स, मुंबई पोलिसांचा धक्कादायक खुलासा

शेळीनं 8 पायांच्या पिल्लाला दिला जन्म मात्र अवघ्या पाच मिनिटानंतर…

सोन्याच्या दरात आज पुन्हा वाढ, वाचा ताजे दर

मोठी बातमी! नाना पटोले यांच्या स्वबळाच्या नाऱ्याला राहुल गांधींचा हिरवा कंदिल

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More