बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शाब्बास पुणेकरांनो! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्याने अखेर करुन दाखवलं, वाचा आजची आकडेवारी

पुणे | कोरोनाने अक्षरश: जगभरात थैमान घातलं आहे. भारतात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने पुण्यात देखील धुमाकूळ घातला होता. पुणे शहर कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलं होतं. मात्र, याच पुण्यात आता कोरोनाबाधितांची संख्या प्रचंड कमी झाली आहे. राज्य सरकारने केलेल्या लॉकडाऊनचा फायदा झाला असल्याचं या कमी झालेल्या संख्येवरून दिसत आहे.

पुण्यात आज दिवसभरात 268 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 284 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 11 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे. यामध्ये 06 जण पुण्याबाहेरील होते.

पुण्यात सध्या 284 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 4,80,150 इतकी आहे. तर पुण्यात 2716 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 8622 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 4,68,812 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 5228 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी दररोज नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यादृष्टीने पुणे महानगरपालिका प्रशासनाने कडक पावलं उचललीत. त्यामुळे ही रूग्णसंख्या घटली.

थोडक्यात बातम्या- 

‘उत्कृष्ट संसदपटूचा दर्जा खालावला’; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला

आमिर खान आणि किरण रावच्या घटस्फोटावर कंगनानं उपस्थित केला प्रश्न, म्हणाली…

“माझ्यावर आरोप म्हणजे सरकारवर आरोप यामुळे सरकारने मला क्लीन चीट द्यावी”

“काल जे काही घडलं ते महाराष्ट्राच्या परंपरेला लाजिरवाणं होतं”

“खोटं कसं बोलावं हे महाविकास आघाडी सरकारकडून शिकलं पाहिजे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More