बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शाब्बास पुणेकरांनो! कोरोनामुक्तीच्या दिशेने पुणेकरांचं पहिलं पाऊल, आजचीही आकडेवारी दिलासा देणारी

पुणे | पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत असली तरी डिस्चार्ज देण्यात येणाऱ्या रूग्णांची संख्या देखील जास्त आहे. आनंदाची बाब म्हणजे आज पुण्यात नव्या रूग्णांची नोंद कमी अन् डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे. राज्य सरकारने केलेल्या लॉकडाऊनचा फायदा होत असल्याचं या कमी झालेल्या संख्येवरून दिसत आहे.

पुण्यात आज दिवसभरात 333 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 535 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 22 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे. यामध्ये 12 जण पुण्याबाहेरील होते.

पुण्यात सध्या 535 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 4,73,300 इतकी आहे. तर पुण्यात 3457 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 8447 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 4,61,396 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 5753 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमागे दररोज नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यादृष्टीने पुणे महानगरपालिका प्रशासनाने कडक पावलं उचललीत. त्यामुळे ही कमी झालेली आकडेवारी अशाच प्रकारे आणखी कमी व्हायला हवी.

थोडक्यात बातम्या- 

कोरोना झालेल्या मुलांना अजिबात देऊ नका ‘हे’ औषध; केंद्राच्या कोरोना उपचारासंबंधी मार्गदर्शक सूचना

शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंतच्या बिनव्याजी कर्जासह मंत्रिमंडळाच्या बैठकीतील 6 मोठे निर्णय

धक्कादायक! कोरोनानंतर आणखी एक जीवघेणा व्हायरस आला समोर, ‘या’ ठिकाणी सापडला पहिला रुग्ण

नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर; आता मिळणार एवढ्या लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज

ग्रेट ग्रँड मस्तीमधील अभिनेत्रीने ट्रेनरचे घेतलेले पंचेस पाहून तुम्हालाही बसेल धक्का, पाहा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More