शाब्बास पुणेकर! पुण्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे, वाचा आजची दिलासादायक आकडेवारी
पुणे | पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत असली तरी डिस्चार्ज देण्यात येणाऱ्या रूग्णांची संख्या देखील जास्त आहे. आनंदाची बाब म्हणजे आज पुण्यात नव्या रूग्णांची नोंद कमी अन् डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे. राज्य सरकारने केलेल्या लॉकडाऊनचा फायदा होत असल्याचं या कमी झालेल्या संख्येवरून दिसत आहे.
पुण्यात आज दिवसभरात 683 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 1,158 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 37 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे.
पुण्यात सध्या 1020 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 4,67,541 इतकी आहे. तर पुण्यात 8356 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 8115 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 4,51,070 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 8751 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांमागे दररोज नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यादृष्टीने पुणे महानगरपालिका प्रशासनाने कडक पावलं उचललीत. त्यामुळे ही कमी झालेली आकडेवारी अशाच प्रकारे आणखी कमी व्हायला हवी.
थोडक्यात बातम्या-
भाजपला धक्का! 10 नगरसेवकांनी भाजपची साथ सोडत हाती बांधलं शिवबंधन
हवेतूनही पसरतोय कोरोना; बचावासाठी केंद्र सरकारकडून नवी नियमावली जारी
मुंबईत आज बरे होणाऱ्यांच्या संख्येपेक्षा नव्या कोरोनाबाधितांची संख्या अधिक, पाहा आकडेवारी
“बाबा रामदेव यांनी माफी मागितली नाही, तर 1 हजार कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकू”
Comments are closed.