बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शाब्बास पुणेकरांनो! कोरोनामुक्तीच्या दिशेने पुणेकरांचं पहिलं पाऊल, वाचा आजची दिलासादायक आकडेवारी

पुणे | पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत असली तरी डिस्चार्ज देण्यात येणाऱ्या रूग्णांची संख्या देखील जास्त आहे. आनंदाची बाब म्हणजे आज पुण्यात नव्या रूग्णांची नोंद कमी अन् डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे. राज्य सरकारने केलेल्या लॉकडाऊनचा फायदा होत असल्याचं या कमी झालेल्या संख्येवरून दिसत आहे.

पुण्यात आज दिवसभरात 297 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 529 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 24 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे. यामध्ये 12 जण पुण्याबाहेरील होते.

पुण्यात सध्या 589 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 4,72,728 इतकी आहे. तर पुण्यात 3699 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 8422 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 4,60,607 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 5052 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमागे दररोज नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यादृष्टीने पुणे महानगरपालिका प्रशासनाने कडक पावलं उचललीत. त्यामुळे ही कमी झालेली आकडेवारी अशाच प्रकारे आणखी कमी व्हायला हवी.

थोेडक्यात बातम्या- 

कोविड सेंटरमध्ये घुसला सहा फूट लांब साप अन्….

लहान मुलांसाठी कोरोनाची तिसरी लाट किती घातक असेल?; एम्सच्या संचालकांनी दिली माहिती

पंतप्रधानांसोबतच्या भेटीसाठी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला नेलं असतं तर….- देवेंद्र फडणवीस

ठाकरे आणि मोदी भेटतात तेव्हा चर्चा तर होणारच- संजय राऊत

“अमरावतीची जनता पुन्हा तुम्हाला रिटेकची संधी देणार नाही, खासदारकीचा राजीनामा द्यावा”

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More