बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आनंदाची बातमी! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे शहराने करून दाखवलं, वाचा आजची आकडेवारी

पुणे | पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत असली तरी डिस्चार्ज देण्यात येणाऱ्या रूग्णांची संख्या देखील जास्त आहे. आनंदाची बाब म्हणजे आज पुण्यात नव्या रूग्णांची नोंद कमी अन् डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे. राज्य सरकारने केलेल्या लॉकडाऊनचा फायदा झाला असल्याचं या कमी झालेल्या संख्येवरून दिसत आहे.

पुण्यात आज दिवसभरात 136 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 223 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 17 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे. यामध्ये 11 जण पुण्याबाहेरील होते.

पुण्यात सध्या 359 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 4,75,990 इतकी आहे. तर पुण्यात 2470 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 8537 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 4,64,983 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 9872 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमागे दररोज नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यादृष्टीने पुणे महानगरपालिका प्रशासनाने कडक पावलं उचललीत. त्यामुळे ही कमी झालेली आकडेवारी अशाच प्रकारे आणखी कमी व्हायला हवी.

थोडक्यात बातम्या-

‘बाळासाहेबांबत राज ठाकरेंना किती आदर आहे हे समोर आलं’; शिवसेनेची राज ठाकरेंवर टीका

“शरद पवार भाडोत्री चाणक्याची भेट घेतात याचा अर्थ त्यांच्या राजकारणाचा अस्त”

कोरोनामुळे यंदाही अमरनाथ यात्रा रद्द; ‘या’ दिवसापासून घेता येणार ऑनलाईन दर्शन

बच्चू कडूंचा गनिमी कावा! वेशांतर करुन शासकीय कार्यालयात गेले अन्…

मराठा आंदोलनावर खासदार संभाजीराजे यांची मोठी घोषणा, म्हणाले….

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More