बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आनंदाची बातमी! पुण्यातील कोरोना रूग्णसंख्येत दिवसेंदिवस होतेय लक्षणीय घट

पुणे | पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत असली तरी डिस्चार्ज देण्यात येणाऱ्या रूग्णांची संख्या देखील जास्त आहे. आनंदाची बाब म्हणजे आज पुण्यात नव्या रूग्णांची नोंद कमी अन् डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे. राज्य सरकारने केलेल्या लॉकडाऊनचा फायदा होत असल्याचं या कमी झालेल्या संख्येवरून दिसत आहे.

पुण्यात आज दिवसभरात 297 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 549 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 25 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे. त्यातील 09 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत.

पुण्यात सध्या 662 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 4,72,254 इतकी आहे. तर पुण्यात 4295 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 8395 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 4,59,564 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 5868 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमागे दररोज नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यादृष्टीने पुणे महानगरपालिका प्रशासनाने कडक पावलं उचललीत. त्यामुळे ही कमी झालेली आकडेवारी कमी व्हायला सुरूवात झाली आहे. पण आता पुण्यात अनलाॅकला सुरूवात झाली आहे. त्यामुळे आता पुन्हा रूग्णसंख्या वाढणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

नागपूरची वाटचाल कोरोनामुक्तीकडे; आज फक्त 196 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

देशातील ‘या’ राज्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल; उद्यापासून होणार अनलॉकला सुरुवात

पुणेकरांसाठी खूशखबर! अखेर ‘या’ मार्गे पुण्यात झालं मान्सूनचं आगमन

टीम इंडीयाच्या ‘या’ अनुभवी खेळाडूनं किचनमध्ये दाखवली आपल्या हाताची जादू; पाहा व्हिडीओ

WTC च्या फाईनलची तयारी करणाऱ्या विराटबद्दल अनुष्कानं भन्नाट कॅप्शन देत पोस्ट केला ‘हा’ फोटो

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More