बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यात कोरोना आटोक्यात?; दिवसभरात तब्बल ‘इतक्या’ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद!

पुणे | पुणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नका सॅनिटायझरचा वापर करा. असं आवाहन प्रशासनातर्फे नागरिकांना वारंवार करण्यात येत आहे. मात्र काही नागरिक बेजबाबदारपणे वागून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवण्यास मदत करत आहेत. पुण्यात कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढत असल्याचं चित्र आहे. आजची कोरोना रुग्णांची आकडेवारी दिलासादायक असल्याचं पाहायला मिळत आहे.

पुण्यामध्ये आज दिवसभरात 4 हजार 849  रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 3 हजार 896 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 53 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे.

पुण्यात सध्या 1050 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 3,34,510 इतकी आहे. तर पुण्यात 53 हजार 376 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 5 हजार 801 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 2,75,333 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 22 हजार 466 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, अत्यावश्यक सेवा वगळताल पुण्यातील सर्व दुकाने बंद राहणार आहेत. राज्य सरकारच्या निर्देशानुसार पुणे महानगरपालिका हद्दीतील अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने 30 एप्रिल 2021 पर्यंत बंद असणार आहेत. तसेच राज्य सरकारच्या विकेंड लॉकडाऊनची अंमलबजावणीही शहरात काटेकोरपणे केली गेली.

थोडक्यात बातम्या –

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More