बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चिंता वाढली… पुण्यात नव्या कोरोनाबाधितांमध्ये विक्रमी वाढ!

पुणे | पुणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नका सॅनिटायझरचा वापर करा. असं आवाहन प्रशासनातर्फे नागरिकांना वारंवार करण्यात येत आहे. मात्र काही नागरिक बेजबाबदारपणे वागून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवण्यास मदत करत आहेत. पुण्यात कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढत असल्याचं चित्र आहे. आजची कोरोना रुग्णांची आकडेवारी धक्कादायक आहे.

पुण्यामध्ये आज दिवसभरात 7 हजार 010 पाॅझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली. तर दिवसभरात 4 हजार 099 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 59 जणांना आपल्या प्राणांना मुकावं लागलं आहे. तर 16 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत.

पुण्यात सध्या 999 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 3,12,382 इतकी आहे. तर पुण्यात 48 हजार 939 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 5 हजार 610 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 2,57,833 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 23 हजार 595 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहेत. राज्य सरकारच्या निर्देशानुसार उद्यापासून पुणे महानगरपालिका हद्दीतील अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने 30 एप्रिल 2021 पर्यंत बंद असणार आहेत. तसेच राज्य सरकारच्या विकेंड लॉकडाऊनची अंमलबजावणीही शहरात काटेकोरपणे केली जात आहे.

थोडक्यात बातम्या – 

‘…तेव्हा कल्याण पण मला म्हणाला असता, दादा तुम्हीही 2 दिवस इकडे नव्हता’; शपथविधीवरुन अजित पवारांची फटकेबाजी

“फडणवीसांनी कोणत्या जिल्ह्यात लसींचा साठा सर्वाधिक आहे ते दाखवून द्यावं”; जयंत पाटलांचा पलटवार

पुणेकरांचा प्रवास सुखकर होणार; नितीन गडकरींनी केली ‘ही’ मोठी घोषणा

“जाणीवपूर्वक लसीकरण बंद करून, लसींच्या बाबतीत चुकीच्या बातम्या पसरविण्याचं कारण काय?”

‘केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी’; नाना पटोले आक्रमक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More