बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिलासादायक! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यात कोरोना रूग्णसंख्येत दिवसेंदिवस घट

पुणे | पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत असली तरी डिस्चार्ज देण्यात येणाऱ्या रूग्णांची संख्या देखील जास्त आहे. आनंदाची बाब म्हणजे आज पुण्यात नव्या रूग्णांची नोंद कमी अन् डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे. राज्य सरकारने केलेल्या लॉकडाऊनचा फायदा होत असल्याचं या कमी झालेल्या संख्येवरून दिसत आहे.

पुण्यात आज दिवसभरात 295 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 321 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 20 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे. त्यातील 11 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत.

पुण्यात सध्या 451 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 4,74,840 इतकी आहे. तर पुण्यात 2738 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 8501 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 4,63,601 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 5958 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमागे दररोज नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यादृष्टीने पुणे महानगरपालिका प्रशासनाने कडक पावलं उचललीत. त्यामुळे पुण्यातील वाढलेली कोरोनाची आकडेवारी कमी व्हायला सुरूवात झाली आहे.

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! कोरोनाच्या सर्व व्हेरिअंट्सवर ‘हे’ औषध प्रभावी, संशोधकांचा दावा

खासदारकी मागायला मी भाजपकडे गेलो नव्हतो- संभाजीराजे भोसले

अभिमानास्पद! जागतिक पातळीवर पुण्याची उल्लेखनीय कामगिरी, ‘या’ स्पर्धेत गाठली अंतिम फेरी

आनंदाची बातमी! कोरोना झाल्यावर वर्षभर…; रिसर्चमधून दिलासादायक खुलासा

कौतुकास्पद! 11 वर्षीय मुलीने साडी घालून स्केटींग करत केली लसीकरणाची जागृती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More