बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिलासादायक! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यात कोरोना रूग्णसंख्येत दिवसेंदिवस घट

पुणे | पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत असली तरी डिस्चार्ज देण्यात येणाऱ्या रूग्णांची संख्या देखील जास्त आहे. आनंदाची बाब म्हणजे आज पुण्यात नव्या रूग्णांची नोंद कमी अन् डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे. राज्य सरकारने केलेल्या लॉकडाऊनचा फायदा होत असल्याचं या कमी झालेल्या संख्येवरून दिसत आहे.

पुण्यात आज दिवसभरात 187 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 319 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 13 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे. त्यातील 06 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत.

पुण्यात सध्या 502 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 4,74,299 इतकी आहे. तर पुण्यात 2888 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 8482 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 4,62,929 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 3441 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमागे दररोज नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यादृष्टीने पुणे महानगरपालिका प्रशासनाने कडक पावलं उचललीत. त्यामुळे पुण्यातील वाढलेली कोरोनाची आकडेवारी कमी व्हायला सुरूवात झाली आहे.

थोडक्यात बातम्या- 

पुणे मनपात खळबळजनक प्रकार! मुख्य विधी अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडलं

“मोदी सरकारनं जगाला दिलेली शिकवण आधी स्वतः अमलात आणावी”

आनंदाची बातमी! सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली ‘ही’ नवी लस कोरोना व्हेरिएंट्सवर 90% प्रभावी

सुशांतच्या प्रोफाईलवरच्या त्या चित्राने सर्वांना हादरवलं, चित्रामागील थरारक कहाणी वाचून बसेल धक्का

“अजित पवार आणि छत्रपती शाहू महाराजांच्या आजच्या भेटीची कल्पनाच नव्हती”- संभाजीराजे भोसले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More