पुणे | देशात कोरोनाबाधितांचा आकडा 324 वर पोहोचला आहे. तर महाराष्ट्रात 24 तासात कोरोना रुग्णांचा आकडा 74 झाला आहे. गेल्या 24 तासात राज्यात 10 नवे रुग्ण आढळले आहेत. यात 6 मुंबईचे आणि 4 पुण्यातील रुग्ण आहेत.
पुणे महानगरपालिका क्षेत्रात आतापर्यंत 15 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 432 जणांचे रिपोर्ट हे नेगिटिव्ह आले आहेत.
पुण्यात आज दिवसभरात 466 रुग्णांचे सॅम्पल गोळा करण्यात आले. यातील 19 जणांचे अद्याप रिपोर्ट आलेले नाहीत. तर 432 जणांना डिस्चार्ज करण्यात आलं आहे.
दरम्यान, एकूण 33 जण कोरोना रुग्णांना रुग्णालयात दाखल केलं आहे. यातील एक जण गंभीर आहे. त्याशिवाय पुण्यात एकूण 1 हजार 637 प्रवासी बाहेरुन दाखल झाले आहेत. त्यातील 876 लोकांना क्वारंटाईन केलं आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
जनता कर्फ्यू सकाळी 5 वाजेपर्यंत वाढवला गरज पडल्यास 31 मार्चपर्यंत वाढवणार!
VVIP उपचारांसाठी कनिका कपूर घालतेय डाॅक्टरांशी हुज्जत
महत्वाच्या बातम्या-
कोंबिंग ऑपरेशनदरम्यान सीआरपीएफवर नक्षलवादी हल्ला; 17 जवानांना वीरमरण
MPSC ची परीक्षा पुढे ढकण्यात यावी; राष्ट्रवादी युवकची मागणी
मोदींनी मानले देशावासियांचे आभार; पंतप्रधानांनी पुन्हा केलंय नवं आवाहन
Comments are closed.