पुणे महाराष्ट्र

पुणेकरांना दिलासा! एकाच दिवशी मिळाल्या ‘या’ दोन बड्या गुडन्यूज…

पुणे | राज्यातील मुंबई पाठोपाठ पुण्यातील कोरोनाचा आकडा भयावह पद्धतीनं वाढला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. मात्र कोरोनाची सोमवारची आकडेवारी पुणेकरांसाठी दिलासादायक ठरली आहे.

पुण्यात सोमवारच्या आकडेवारीनुसार दिवसभरात 781 नवे रूग्ण आढळले असून तब्बल 1822 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यानुसार पुण्यात पहिल्यांदाच कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांचा आकडा हा कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांपेक्षा दुप्पट झाल्याचं पहायला मिळालं.

तसेच एकूण ॲक्टिव्ह रूग्ण संख्याही 1 हजाराने घटली असल्यानं पुणेकरांसाठी ही नक्कीच दिलासादायक बाब म्हणावी लागेल. पुणे जिल्ह्यातही रविवारी 3 हजार नवे रुग्ण सापडले होते, तर सोमवारी हाच आकडा 1998 वर घसरला आहे.

दरम्यान, राज्यातही सलग तिसऱ्या दिवशी नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक असल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे. काल दिवसभरात 10 हजार 221 रुग्ण बरे होऊन घरी गेले तर 8968 नवीन रुग्णांची राज्यात नोंद झाली आहे. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण बरे होत असल्यानं राज्यातील ॲक्टीव्ह रुग्णांची संख्याही कमी होत आहे.

महत्वाच्या बातम्या-

सुशांत आत्महत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू आहे- अनिल देशमुख

महाराष्ट्र-बिहार संघर्षादरम्यान पहिल्यांदाच मुंबई पोलिस आयुक्त मीडियासमोर, म्हणाले…

जगातील ‘ही’ मोठी कंपनी TikTok खरेदी करण्याच्या तयारीत!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या