पुणे | गजा मारणे प्रकरणात तत्परता दाखवल्यानंतर पुणे पोलिसांचं कौतुक होत आहे. त्याआधीही पुणे पोलिसांकडून गुरूवार पेठेत शक्तीप्रदर्शन करणाऱ्या गुंडाला अटक करण्यात आली होती. त्यामुळे पुण्यात गुंडांवर चांगलाच चाप बसला आहे. गजा मारणेला अटक केल्यानंतर पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुंडांना कडक शब्दात ताकीद दिली आहे.
‘गजा मारणेवरची कारवाई फक्त ट्रेलर होता. गुंडांनी वेळीच सुधारावे नाहीतर फोडून काढण्यात येईल.’ असे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी खडसावून सांगितले आहे. कायदा सुव्यवस्थेवर जो कोणी बाधा पोहचवेल, तसेच जो कोणी नागरिकांमध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न करेल. त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे गुप्ता यांनी सांगितले आहे.
गुरूवार पेठेत शक्तीप्रदर्शन करणारा मुळशीतील गुंड शरद मोहोळला पोलिसांनी 26 जानेवारीला अटक केली होती. त्याच्या साथीदारांना देखील ताब्यात घेतलं होतं. त्यामुळे पोलिसांनी गुंडांना आपला खाक्या दाखवल्याची चर्चा होती, मात्र त्यानंतर एक असा प्रकार घडला ज्यानं साऱ्या महाराष्ट्राला गुंड पुन्हा वरचढ ठरतात की काय अशी भीती वाटावी, असं वातावरण निर्माण करणारी घटना घडली.
अमोल बधे आणि पप्पु गावडे यांच्या हत्या प्रकरणातून तळोजा कारागृहातून गजा मारणे सुटला होता. तुरुंगातून बाहेर येताच गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांनी मुंबई पुणे महामार्गावर धुडगूस घातला होता. त्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिस आणि पुणे पोलिसांनी गजा मारणेवर कारवाई केली होती. त्याच्यासह 200 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, हे गुन्हे वेगवेगळ्या पोलिस स्थानकात दाखल केले गेले आहेत.
थोडक्यात बातम्या-
अर्जुनला विकत घेतल्यावर मुंबई इंडियन्स म्हणते, क्रिकेट त्याच्या रक्तात आहे!
अखेर सचिनच्या मुलाला मुंबई इंडियन्सनंच विकत घेतलं, इतकी मिळाली किंमत!
सावधान! ‘या’ ठिकाणावरुन पुण्यात यायचं असेल तर कोरोना चाचणी बंधनकारक
सचिनचा मुलगाच नव्हे तर सेहवागचा ‘हा’ नातलगही IPLच्या रणांगणात!
अंकिताने बिकीनीमध्ये टाकला फोटो, सुशांतचे फॅन चांगलेच भडकले, म्हणाले…