बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पूजा चव्हाण प्रकरणात समोर आला पुणे पोलीस आयुक्तांचा अत्यंत धक्कादायक व्हिडीओ

पुणे | पूजा चव्हाण प्रकरण सध्या महाराष्ट्रात चांगलेच गाजत असून महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री संजय राठोड यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. असं असलं तरी या प्रकरणाचं सत्य काय आहे, हे अद्याप बाहेर आलेलं नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पुणे पोलिसांवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत, त्यातच आता पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

पुण्यात नुकताच सैन्य भरती परीक्षेचा पेपर फुटल्याची धक्कादायक घटना घडली होती. पोलिसांनी या प्रकरणात दोन जणांना अटक केली होती, या प्रकरणाची माहिती देण्यासाठी पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषद बोलवली होती, याच पत्रकार परिषदेच्या मध्यात पत्रकारांनी पूजा चव्हाण प्रकरणासंबंधी प्रश्न विचारताच पोलीस आयुक्त हसत हसत उठले आणि त्यांनी कोणत्याही प्रश्नाचं उत्तर न देताच हसत हसत या पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतला.

पूजा चव्हाण प्रकरणात पुणे पोलीसांच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली जात आहे. कारण या प्रकरणाचा तपास करण्यासाठी यवतमाळ व बीड अशा ठिकाणी पोलिसांची पथकं गेली होती, मात्र या पोलिसांनी कुणाचा तपास केला?, त्यातून काय माहिती मिळाली?, याबाबत पोलिसांनी अद्याप काहीच माहिती दिलेली नाही. दुसरीकडे पूजाचा पोस्टमार्टम रिपोर्ट पोलिसांना मिळाला असून त्यात तिच्या गर्भपातासंबंधी कोणती माहिती आहे?, अशी विचारणा पत्रकारांनी केली होती, मात्र पोलीस आयुक्तांनी हसत या प्रश्नाला बगल देत पत्रकार परिषदेतून काढता पाय घेणं पसंत केलं.

पूजा चव्हाण प्रकरण अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, याच प्रकरणात मंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला आहे. सरकारवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. लोकांसमोर सत्य येत नसल्याचा आरोप केला जात आहे, अशा प्रकरणात पोलीस अशाप्रकारे हसून प्रश्न टाळत असतील तर पोलीस खरंच या प्रकरणाच्या तपासाबाबत गंभीर आहेत का?, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

‘IPLमध्ये खेळापेक्षा पैशांवर लक्ष, आयपीएलपेक्षा पीएसएल भारी’; डेल स्टेनचा जावई शोध

राठोडांनी पाच कोटी दिल्याचा आरोप केल्यावर लहू चव्हाणांनी शांता राठोडांविरोधात उचललं मोठं पाऊल

‘शिवसेना नेत्यांकडून माझ्या जीवाला धोका’, कंगणानं उचललं हे मोठं पाऊल

‘कोहली’ने केला होता तब्बल 2 लाखांचा दारूसाठा, पोलिसांनी धाड टाकल्यावर पितळ पडलं उघडं!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More