Pune Crime | ‘ती’ एक चूक बॉसला पडली महागात; कर्मचाऱ्याने केलं भयानक कृत्य

Pune Crime | पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली आहे. कोणत्या न कोणत्या कारणामुळे लोकांमध्ये वाद होतात आणि हे वाद कधी कधी शिगेला जाऊन पोहोचतात. पुण्यात असाच एक वाद कर्मचारी आणि बाॅसमध्ये झाला.

काय आहे नेमकं प्रकरण?

पुण्यातील चंदनगर परिसातील मुंढवा येथे इंस्टा गो प्राइवेट लिमिटेड कंपनीमध्ये आरोपी कामाला होता. कंपनीतील कर्मचाऱ्यांनी आरोपीच्या वागणुकीबद्दल बाॅस जवळ तक्रार केली.

बाॅसने त्यानंतर आरोपीला संपर्क साधायचा प्रयत्न केला असता आरोपीने कोणताच रिस्पाॅन्स दिला नाही. दरम्यान कंपनीच्या बाॅसने आरोपीला व्हॅट्स्पअॅप ग्रुपमधून काढला.

आरोपीला राग अनवार न झाल्याने त्याने कसलाच विचार न करता ऑफीसमधील सर्व कर्मचाऱ्यांसमोरच बॉसला काठीने मारहाण केली. एवढंच नव्हे तर त्याने ऑफीसमधील सामानाचीही तोडफोड केली शिवाय संतप्त कर्मचाऱ्याने बॉसचा आयफोनही फोडला.

पुढे काय घडलं?

घडलेल्या प्रकारानंतर कंपनीच्या बाॅसने आरोपी विरोधात तक्रार केली असता यासंदर्भात चंदन नगर पोलिस स्टेशनमधील अधिकारी पुढील तपास करत आहेत. कंपनीचा बाॅस मुळचा लोहगाव येथील खांडवे नगर येथील रहिवासी आहेत.

थोडक्यात बातम्या-

Skin Care | ग्लोईंग स्कीनसाठी रोज ‘या’ गोष्टी न चुकता करा

Gold-Silver Price Today | ऐन लग्नसराईत सोनं महागलं; जाणून घ्या आजचे दर

Devendra Fadnavis | महायुतीत वादाची ठिणगी?; फडणवीसांचा थेट अजित पवारांना इशारा

Rohit Sharma | गौतम गंभीरनं उडवली रोहित शर्माची खिल्ली

Karan-Tejasswi | करण कुंद्रा-तेजस्वी प्रकाशच्या चाहत्यांसाठी मोठी गुड न्यूज!