Top News पुणे

चहा पिताना एकमेकांकडे पाहणं पडलं महागात, तिघांनी तरूणावर कोयत्याने केले वार

पुणे | वडगावमध्ये रविवारी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एकमेकांकडे पाहण्याच्या वादातून कोयत्याने वार केल्याची गोष्ट समोर आली आहे. चहा पित असताना एकमेकांकडे पाहिलं आणि याच रागातून ही घटना घडलीये.

चहा पित असताना एकमेकांकडे पाहण्याच्या रागातून तीन जणांनी तरुणावर कोयत्याने सपासप वार केलेत. ही घटना वडगाव बुद्रुक परिसरात घडलीये. यामध्ये वार करण्यात आलेला तरुण गंभीर जखमी झाला आहे.

या सर्व प्रकरणाची 25 वर्षीय शुभम ढमाळ यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास शुभम आणि त्यांचा मित्र दत्ता खारगे चहा पिण्यासाठी कुदळे पाटील कमानीसमोरील टपरीवर गेले होते. दरम्यान याच वेळेस त्याठिकाणी चहा पित असलेल्या तिघांकडे शुभमने पाहिलं. त्याचा राग आल्यामुळे त्यांनी शुभमला आणि दत्ताला शिवीगाळ केली. त्यामुळे झालेल्या भांडणातून तिघांनी शुभमवर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केलं.

महत्त्वाच्या बातम्या-

आज ६७११ रूग्ण बरे होऊन घरी, तर राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६९ टक्क्यांवर- राजेश टोपे

आपत्कालीन परिस्थितीत केंद्र सरकार राज्य सरकारांसोबत, पंतप्रधान मोदींची ग्वाही

लातूर जिल्ह्यातील लॉकडाऊन ‘या’ तारखेला शिथिल होणार, पालकमंत्री अमित देशमुख यांची घोषणा

माझ्यासाठी दुसरा कुठला जाॅब असेल तर बघा; का म्हणत आहे अमिताभ बच्चन असं?

…मग नका जाऊ स्टार किड्सचे चित्रपट पहायला, करिना कपूर खानचं धक्कादायक वक्तव्य

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या