कॅब ड्रायव्हरच्या कृत्याने पुणे हादरलं!; सॉफ्टवेअर इंजिनिअर तरूणीसोबत भयंकर घटना

Pune Crime Cab Driver Masturbates in Front of Woman Passenger

Pune Crime | पुण्यात (Pune Crime) गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होत असून, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कल्याणीनगर (Kalyani Nagar) परिसरात एका 20 वर्षीय कॅब ड्रायव्हरने (Cab Driver) महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरसमोर (Software Engineer) गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

नेमके काय घडले?

21 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7:30 वाजता, कल्याणीनगरमधील एका कंपनीतील महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरने प्रवास करण्यासाठी कॅब बुक केली. संगमवाडी रोडवर (Sangamwadi Road) तिला घेण्यासाठी एक कॅब आली.

गाडी चालवत असताना, आरोपी तरुण ड्रायव्हरने रियर व्ह्यू मिररमधून (rear-view mirror) पीडितेकडे पाहून हस्तमैथून(Masturbates) करण्यास सुरुवात केली. यामुळे भयभीत झालेल्या तरुणीने महामार्गावर गाडी थांबवून थेट पोलिस स्टेशन गाठले.

आरोपीला अटक

रविवारी खडकी पोलिसांनी (Khadki Police) 20 वर्षीय कॅब ड्रायव्हरला अटक केली. खडकी पोलिसांचे निरीक्षक गजानन चोरमले (Gajanan Chormale) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुमित कुमार (Sumit Kumar) हा मूळचा उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) उन्नाव (Unnao) येथील असून, तो नुकताच मुंबईतून पिंपरी-चिंचवडला कामासाठी आला होता. (Pune Crime)

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. अशात घटनेमुळे, पुण्यातील महिलांच्या सुरक्षिततेबाबतही चिंता वाढली आहे.

Title : Pune Crime Cab Driver Masturbates in Front of Woman Passenger

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .