Pune Crime | शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात गेल्या महिन्यांपासून विचित्र घटना घडत आहेत. अपघात प्रकरण, ड्रग्स प्रकरण तर कधी भरदिवसा गोळीबार, गुंडांची दहशत यामुळे पुण्याच्या कायदा सुव्यवस्थेवर अनेक प्रश्न निर्माण केले जात आहेत. अशात पुण्यात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. खराडी भागात मुळा, मूठा नदी पात्रात एका तरुणीचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. (Pune Crime)
शिरच्छेद झालेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळला असल्याने येथे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अत्यंत क्रूर पद्धतीने ही हत्या करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीचे डोकं, हात-पाय धडापासून वेगळे करण्यात आले होते. ही मृत तरुणी 18 ते 20 वयोगटातील असल्याचं सांगितलं जात आहे.
पुण्यात तरुणीचा निर्घृण खून
या प्रकरणी आता पोलिसांकडून तपास सुरू आहे. हात, पाय आणि डोकं नसलेल्या अवस्थेत धड पोलिसांना नदीपात्रात मिळालं आहे. या मृत तरुणीची अद्याप ओळख पटली नाही. चंदननगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. (Pune Crime)
या तरुणीची अत्यंत अमानुष पद्धतीने हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे पुणे हादरून गेलं आहे. यामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. आरोपीने तरुणीचे धडापासून हात-पाय आणि मुंडकं वेगळं केलं.धारदार शस्त्राच्या सहाय्याने त्याने हे अवयव कापले.या घटनेचा आता तपास सुरू आहे. (Pune Crime)
News Title – Pune Crime girl murder dead body found in kharadi river
महत्त्वाच्या बातम्या-
रोज सकाळी फक्त 1 किलोमीटर चालल्याने किती कॅलरिज बर्न होतात?
निक्कीच्या ‘त्या’ वागण्यामुळे अरबाजने घरात केली तोडफोड; बिग बॉस काय करणार?
बँकेत नोकरी करायचं स्वप्न होणार साकार; तब्ब्ल ‘इतक्या’ जागांसाठी भरती सुरु
“राजे माफ करा..”; शिवरायांच्या पुतळा दुर्घटनेनंतर रितेश देशमुखची पोस्ट
पुढील 48 तास धोक्याचे, IMD कडून ‘या’ जिल्ह्यांना हायअलर्ट