Pune Crime | पुण्यात गेल्या काही महिन्यांपासून धक्कादायक घटना घडत आहेत. गुंडांची दहशत, भरदिवसा गोळीबार होणे, अपघात सत्र यामुळे पुण्यात सुरक्षेच्या दृष्टीने अनेक प्रश्न निर्माण करण्यात आले. अशात अजून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. पुण्यातील मध्यभागात हा गोळीबाराचा थरार पाहायला मिळालाय. (Pune Crime)
या घटनेत 5 राउंड फायर झाल्याची माहिती मिळत आहे. गोळीबार केल्यानंतर आरोपी फारार झाले आहेत. वनराज आंदेकर यांच्यावर रविवारी रात्री साडे आठ वाजता नाना पेठेत गोळीबार झाला. गोळीबारानंतर त्यांच्यावर कोयत्याने वारही करण्यात आले असल्याची माहिती आहे.
माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार
हल्ला झाला तेव्हा आंदेकर यांच्यासोबत इतर सहकारी नव्हते. त्याचवेळी हल्लेखोरांनी संधी साधून तीन ते चार जणांनी आंदेकर यांच्यावर गोळ्या झाडल्या. गोळीबारानंतर वनराज आंदेकर यांना तातडीने केईएम रुग्णालयात हलवण्यात आलं. (Pune Crime)
गोळीबार झाल्यानंतर या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती. रुग्णालयाच्या बाहेर देखील गर्दी झाली. या घटनेमुळे पुण्यात पुन्हा एकदा गुन्हेगार डोकं वर काढताना दिसत आहेत. त्यामुळे पोलिसांची भीती कोठे राहिली आहे का?, असा प्रश्न आता निर्माण होत आहे.
वनराज आंदेकर यांच्यावर त्यांचे दाजी गणेश कोमकर यांनी गोळीबार केल्याची चर्चा आहे. कारण, गणेश कोमकर याने याआधी शिवसेना शहप्रमुख रामभाऊ पारेख यांच्यावर एसिड हल्ला केला होता. आता वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. (Pune Crime)
कोण आहेत वनराज आंदेकर?
वनराज आंदेकर पुणे महानगरपालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमधून नगरसेवक म्हणून विजयी झाले होते. तर, वनराज आंदेकर यांच्या मातोश्री राजश्री आंदेकर 2007 आणि 2012 मध्ये दोनवेळा नगरसेविका होत्या. (Pune Crime) गोळीबारा नंतर आंदेकर यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
News Title : Pune Crime ncp formerc corporator vanraj andekar killed in gun firing
महत्वाच्या बातम्या-
आज शेवटच्या श्रावण सोमवारी ‘या’ राशींचं भाग्य उजळणार, नशिबात सुख-समृद्धी देणार
‘…अन्यथा तुतारी वाजवू’; राष्ट्रवादीच्याच नेत्याचा अजित पवारांना इशारा
मोठी बातमी! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने पत्नी अन् 2 मुलांसह संपवलं आयुष्य
भाजप नेत्याचे अजित पवारांवर गंभीर आरोप; दादांचं टेंशन वाढलं!
‘मी कपडे बदलताना…’; अभिनेत्रीच्या गंभीर आरोपानं खळबळ