Pune Crime News | पुणे शहरात (Pune Crime News) गेल्या काही दिवसांपासून कोयता गँगची दहशत सुरू आहे. यामुळे पुणे शहराच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. पुण्यातील महम्मदवाडी परिसरात पानटपरीवर कोयता गँगच्या काही गुंडांनी कोयत्याने हल्ला केला. पानटपरीवर टपरी चालवणाऱ्यावर कोयता गँगने हल्ला केला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं समजतंय. त्यामध्ये दुकानाची तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार देखील घडलेला पाहायला मिळाला आहे. (Pune Crime News)
पुणे हे विद्येचं माहेरघर आहे. मात्र गेल्या काही वर्षात पुण्यात सऱ्हास गुन्हेगारी (Pune Crime News) सत्र पाहायला मिळत आहे. विविध टोळ्या पुणे शहरामध्ये गुन्हेगारी क्षेत्रात पाहायला मिळतात. यामुळे ऐतिहासिक वारसा आणि शिक्षणाचं केंद्र बिंदू मानलं जाणाऱ्या पुणे शहरामध्ये गुन्हेगारांचा (Pune Crime News) वावर असल्याने येथील नागरिक आपला जीव मुठीत घेऊन जगत आहेत.
व्हिडीओ व्हायरल
पुण्यातील महम्मदवाडी परिसरामध्ये पान टपरीवर हल्ला केल्याने महम्मदवाडी परिसर पुरता हादरून गेला आहे. कोयता गँगचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. सीसीटीव्ही पाहिल्यास समजतं की, तोंडाला मास्क लावून दोघेजण आले, त्यांनी कोयत्याने टपरीवर हल्ला केला. तसेच दुकानदाराला देखील मारहाण केली आणि त्याच्यावर कोयत्याने वार केले. तर एकाने दुकानातील सामान फेकले, बाटल्या फोडल्या आणि हल्लेखोरांनी तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला.
कोयता गँगची दहशत
हल्ला करण्याचे अद्यापही ठोस कारण समोर आले नाही. पण सीसीटीव्हीच्या अधारे पोलीस कसून चौकशी करत आहेत. यामुळे आसपासच्या परिसरामध्ये भीतीचं वातावरण आहे. हल्लेखोरांचा तत्काळ शोध घेऊन कारवाई करण्यात यावी, अशी माहिती समोर आली आहे.
याआधीही कोयता गँगने हौदास माजवला होता. याचे विपरित परिणाम हे नागरिकांना भोगावे लागत आहे. शहरातील प्रत्येक भागात कोयता गँगने दहशत पसरवली आहे.
पुण्यात काही महिन्यांआधी कुख्यात गुंड शरद मोहोळवर देखील गोळीबार करण्यात आला होता. त्याचे सीसीटीव्ही देखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत होते. तसेच एक तरूणाला एका मुलीने प्रेमसंबंधासाठी नकार दिल्याने त्या तरूणाने तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथे असलेल्या काही उपस्थितांमुळे ती तरूणी वाचली.
News Title – Pune Crime News Koyta Gang Attack On Paan Stall
महत्त्वाच्या बातम्या
शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं! तब्बल ‘इतक्या’ दिवस अवकाळी पावसाचा इशारा
चंद्रकांत पाटलांचं ते वक्तव्य ठरलं बारामतीत कमी मतदान पडण्याला कारणीभूत
पुण्याच्या निवडणुकीत मिठाचा खडा; निवडणुका आयोगाने उमेदवारांना पाठवल्या धडाधड नोटिसा
या राशीच्या व्यक्तींना मित्रमंडळींच्या मदतीने उत्पन्नाच्या संधी मिळतील
“तेच आदित्य ठाकरे ज्यांच्या ज्यूस आणि नाश्त्याची सोय श्रीकांत शिंदे करायचे”