पुणे महाराष्ट्र

…म्हणून 25 वर्षीय महिलेनं महिला पोलिसाचा हात पिरगळला; महिलेला अटक

पुणे | वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन केल्यामुळे कारवाई करत असल्याचे पाहून २५ वर्षीय महिलेनं महिला पोलीस कर्मचाऱ्याचा हात पिरगाळत मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. भवानी पेठेत राहणाऱ्या या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.

मुंढवा पोलिस स्टेशनमध्ये महिला पोलिस नाईक ए. ए. दिवेकर यांनी यासंदर्भात तक्रार दिली आहे. आरोपी महिलेच्या विरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. सोमवारी सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास मुंढवा चौकात ही घटना घडली.

महिला पोलिस कर्मचारी दिवेकर मुंढवा चौकात वाहतूक नियमन करत होत्या. यावेळी आरोपी महिलेची दुचाकी झेब्रा क्रॉसिंगवर असल्याचे त्यांना दिसले, दिवेकर यांनी त्याचा फोटो काढून कारवाई करण्यास सुरुवात केली यामुळे या महिलेला राग आला.

आरोपी महिलेनं दिवेकर यांना कारवाई करण्यास मनाई केली तसेच त्यांचा हात पिरगळला. त्यांच्या अंगावर धावून जात सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी आता सहाय्यक पोलीस निरीक्षक रेजितवाड पुढील तपास करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

सचिन पायलट यांच्या समर्थकांची नाराजी काँग्रेसला भोवली, राजस्थान काँग्रेसमध्ये भूकंप!

100 वर्षीय आजोबांची कोरोनावर मात; वाढदिवसाचा केक कापूनच मिळाला डिस्चार्ज

मुंबईसह राज्यभरात ऑरेंज अलर्ट जारी; ‘या’ भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा

कोरोनावर मात करण्यासाठी शरद पवारांनी बारामतीकरांसाठी दिली अनोखी भेट!

ज्या नवरदेवामुळे झाली प्रशासनाची दैना, त्याला २५ हजार रुपयांचा दंड

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या