फुकट जेवून दमदाटी करणाऱ्या गावगुंडाची खांडोळी, 5 जणांना अटक

पुणे | फुकट जेवण करून दमदाटी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराची हत्या करून खांडोळी केल्याचा धक्कादायक प्रकार तब्बल 10 महिन्यांनी उघडकीस आलाय.

दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या 5 आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या चौकशीमध्ये आरोपी विक्रम पिल्लेनं जानेवारीमध्ये विकी पोताणची हत्या केल्याचं कबूल केलं.

विक्रमच्या चायनीज गाडीवर विकी येऊन खाऊन जायचा आणि पैसे न देता दमदाटी करायचा, त्यामुळे कंटाळून विक्रमने त्याच्या हत्येचा कट रचला आणि त्याची हत्या करून खांडोळी केली. त्याबरोबरच मृतदेह जाळण्याचाही प्रयत्न केला.