बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिलासादायक! पुण्यातील कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत मोठी घट

पुणे | गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत असताना पाहायला मिळत आहे. नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत देखिल वाढ होत आहे. महाराष्ट्र शासनाच्या मदतीने महानगरपालिका प्रशासनाला कोरोना रूग्णसंख्या कमी करण्यासाठी आता यश येताना दिसत आहे कारण, पुण्यातील कोरोनाग्रस्तांची आजची आकडेवारी ही अत्यंत दिलासादायक  असल्याचं पाहायला मिळत आहे.

पुण्यामध्ये आज दिवसभरात 2 हजार 538 रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 4 हजार 351 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 70 जणांना आपल्या प्राणांना मुकावं लागलं आहे. यातील 16 रूग्ण पुण्याबाहेरील आहेत.

पुण्यात सध्या 1371 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 4,02,655 इतकी आहे. तर पुण्यात 47 हजार 420 सक्रिय रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 6 हजार 554 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 3,48,681 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 16 हजार 112 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासुन वाढता रुग्णांचा आकडा हळुहळु खाली येत असल्याचं पाहायला मिळत असल्याने नागरिकांमध्ये काही प्रमाणात आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान, 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. यानंतर अनेक राज्यांनी 18 वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस मोफत देण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रात देखील 18 ते 45 वयोगटातील प्रत्येकाचं मोफत लसीकरण करण्यात येणार असल्याचं मंत्री नबाव मलिक यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या – 

मोठी बातमी! सुजय विखेंनी विमानाने आणलेले रेमडेसिविर ताब्यात घेण्याचे न्यायालयाचे आदेश

“आयपीएल खेळणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांनो… तुम्हीही भारताला मदत करा”

“आता लोकांनी घरातही मास्क घालण्याची वेळ आली आहे”

रक्ताच्या नात्यानेच फिरवली पाठ! आईला कोरोना झाल्यामुळे मुलाने…

धक्कादायक! पत्नीचा कोरोना रिपोर्ट पाॅझिटिव्ह आल्याने पतीने केलं माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More