महाराष्ट्रातील ‘हा’ जिल्हा कोरोनाचं नवं हॉटस्पॉस्ट; एकाच दिवसात 10 हजार रुग्ण!
पुणे | महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आता लॉकडाऊनचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यातच कालची महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची रुग्णसंख्या विक्रमी आहे. काल एका दिवसात तब्बल 50 हजारांच्या घरात रूग्णसंख्या गेल्याने चिंतेचं वातावरण पसरलं आहे.
महाराष्ट्र लाॅकडाऊनच्या उंबरठ्यावर असताना शनिवारी दिवसभरात पुणे जिल्ह्यात तब्बल 10 हजाराहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकीकडे कोरोना प्रादुर्भाव कमी झाला म्हणून पुण्यातील कोव्हिड सेंटर काही दिवसांपूर्वी बंद करण्यात आले होते. पण आता झपाट्याने होणाऱ्या रुग्णवाढीमुळे ती पुन्हा एकदा सुरू करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू झाले आहेत.
शनिवारी पुणे शहरात 5720 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पिंपरी-चिंचवडमध्ये 2832 तर ग्रामीणमध्ये 1500 रुग्णसंख्या झाली आहे. त्यामुळे पुणेकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. एकीकडे कोरोनाचा संकट वाढतंय. तर दुसरीकडे लॉकडाऊनवरून राजकारणही तापत असल्याचं पाहायला मिळत आहे.
पुण्यामध्ये आता समूह संसर्ग होतोय की काय? अशी भीती जनमानसात पसरली आहे. पुण्यात सध्या मिनी लाॅकडाऊन लागू करण्यात आला असून संध्याकाळी 6 ते सकाळी 6 पर्यंत पूर्णपणे संचारबंदीचे आदेश दिले आहेत. याची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांमार्फत 96 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आलेली आहे. त्यामुळे पुणे हे आता पुन्हा एकदा कोरोनाच नवं हॉटस्पॉट बनल्याचं चित्र दिसून येत आहे.
थोडक्यात बातम्या –
राहुल तेवतियाचा खतरनाक अंदाज, नेट प्रॅक्टिसचा व्हिडीओ तुफान व्हायरल
अवघ्या 12 वर्षांच्या मुलानं केली आत्महत्या, कारण ऐकून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही!
आयुष्याच्या संघर्षाला कंटाळला; पत्नी आणि दोन मुलांना संपवून लिहिली धक्कादायक सुसाईड नोट
मंत्रिमंडळाची तीन वाजता महत्त्वाची बैठक, लॅाकडाऊनबद्दल होऊ शकतो ‘हा’ मोठा निर्णय!
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात भयाण वास्तव, कोरोना रुग्णांच्या अंत्यसंस्काराला माणसं मिळेना!
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.