कोरोना पुणे

ड्रायव्हरला कोरोना झाल्याने पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर होम क्वारंटाईन

पुणे | कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी विभागातील पाच जिल्ह्यांचे प्रशासकीय पातळीवर नियोजन करणारे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी स्वतःला क्वारंटाईन करून घेतलं आहे. डॉ. म्हैसेकर यांच्या ड्रायव्हरला कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्यांनी हा निर्णय घेतलाय. डॉ. म्हैसेकर यांची तपासणी करण्यात आली असून नमुना अहवाल येईपर्यंत ते घरातून कामकाज पाहणार आहेत.

पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या ड्रायव्हरने कोरोना चाचणी केली. ड्रायव्हरच्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यांनतर दीपक म्हैसेकर यांनीही खबरदारीचा उपाय म्हणून होम क्वारंटाइन राहण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी दररोज बैठका घेणं, घटनास्थळाची पाहणी करणे, मंत्र्यांच्या दौऱ्यांना उपस्थित राहणं यांसारखी कामे डॉ. म्हैसेकर करत आहेत. त्यांच्या ड्रायव्हरची तपासणी करण्यात आली असता, अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांच्या ड्रायव्हरला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अहवाल येईपर्यंत डॉ. म्हैसेकर हे घरून काम करणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आलंय.

कोरोना नियंत्रणाच्या सर्व बैठका दीपक म्हैसेकर यांच्या उपस्थितीत पार पडते. या बैठकीला अनेक पदाधिकारी उपस्थित होते. पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्तासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-

राज्यात आज 6741 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद, पाहा तुमच्या भागात किती?

‘हे’ कारण देत कोरोना टेस्ट करण्यास रेखाने दिला नकार!

‘नागपुरातील हनीट्रॅप प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर चौकशी करा’; देवेंद्र फडणवीसांचं अनिल देशमुखांना पत्र

आता महाराष्ट्रातील ‘या’ शहरातही १६ जुलैपासून लॉकडाऊन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या