Pune Divorce Case | पुण्यातील कौटुंबिक न्यायालयाने (Family Court) दिलेल्या एका घटस्फोटाच्या (Divorce) निकालाची (Verdict) सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. न्यायालयाने घटस्फोटाला मंजुरी देताना पतीला कठोर आदेश दिले आहेत. त्यानुसार, पतीने पत्नीला लग्नात मिळालेले सर्व दागिने (Jewelry) आणि भेटवस्तू (Gifts) परत कराव्यात, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. (Pune Divorce Case)
कोर्टाने आदेशात सर्व परत करण्यासाठी पतीला तीन महिन्यांचा कालावधी (Time Period) दिला आला आहे. यासोबतच, पत्नीला १० लाख रुपये कायमस्वरूपी पोटगी (Permanent Alimony) आणि लग्नाच्या खर्चापोटी (Marriage Expenses) १० लाख रुपये देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
लग्नाचा खर्च परत करण्याचा दुर्मिळ आदेश
पत्नीला पोटगी आणि लग्नाच्या खर्चाचे पैसे परत करण्यासाठी न्यायालयाने पतीला सहा महिन्यांचा अवधी दिला आहे. इंडियन एक्स्प्रेसने (Indian Express) दिलेल्या वृत्तानुसार, महिलेचे वकील अजिंक्य साळुंखे (Ajinkya Salunkhe) आणि मयुर साळुंखे (Mayur Salunkhe) यांनी सांगितले की, “कोर्टाने अशा प्रकारचे आदेश याआधी दिल्याचं आमच्या तरी ऐकिवात नाही. लग्नाचा खर्च परत करण्याचा हा दुर्मिळ (Rare) निर्णय आहे.”
दारुड्या पतीपासून महिलेची सुटका
महिलेचा पती खूप दारू प्यायचा (Alcoholic) आणि तिला त्रास द्यायचा. तसेच तो लग्नाबद्दल बेजबाबदार (Irresponsible) होता, असा आरोप महिलेने केला होता. महिलेवर एक वर्ष शारीरिक (Physical) आणि मानसिक अत्याचार (Mental Harassment) केले गेले. याच आधारावर तिला घटस्फोट मंजूर करण्यात आला, असे वकिलांनी सांगितले. (Pune Divorce Case)
घटस्फोटानंतरही छळ सुरूच
घटस्फोटाची प्रक्रिया सुरू असताना पती-पत्नी विभक्त राहत होते. तरीही पतीने पत्नीला त्रास देणे सुरूच ठेवले. पतीने व्हॉट्सऍपवर (WhatsApp) पत्नीला दुसऱ्या महिलांसोबतचे स्वतःचे फोटो पाठवले.
तसेच, स्वतःच्या फेसबुक स्टोरीमध्येही (Facebook Story) तो अनेक मुलींसोबत असायचा. यामुळे महिलेला मानसिक त्रास (Mental Trauma) सहन करावा लागला, अशी माहिती महिलेच्या वकिलांनी दिली. (Pune Divorce Case)
Title : Pune Divorce Case Husband ordered to return marriage expenses
महत्वाच्या बातम्या-
टोरेस घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट समोर!
सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर गुन्हेगाराने केलं असं काही की…, तपासात गुंता वाढला
बीडमध्ये चाललंय काय?, संतोष देशमुखांच्या हत्येनंतर ‘या’ घटनांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे