TWIPLES - पुण्यात पहिला ट्विटप, मराठी टिवटिवसाठी नव्याने निर्धार
- पुणे, महाराष्ट्र

पुण्यात पहिला ट्विटप, मराठी टिवटिवसाठी नव्याने निर्धार

पुणे | पुण्याच्या सारसबागेत पहिला ट्विटप पार पडला. यावेळी मराठी भाषेच्या प्रचार प्रसारासाठी ट्विटरवर सातत्याने सक्रीय असलेले अनेकजण एकमेकांना पहिल्यांदाच भेटले.

ट्विटरवर मराठी भाषेचा वापर वाढावा, मराठी विषय ट्रेंड व्हावेत यादृष्टीने या भेटीत चर्चा करण्यात आली. ‘मराठीरिट्विट’ आणि ‘मराठीविश्वपैलू’ या ट्विटर हँडलनी यासाठी महत्त्वाची जबाबदारी स्वीकारली आहे. यावेळी हुंडा देणार नाही आणि घेणार नाही, अशी शपथ सर्वांनी घेतली. तसेच ‘मी अंघोळीची गोळी’ या उपक्रमाची माहितीही देण्यात आली. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

1 thought on “पुण्यात पहिला ट्विटप, मराठी टिवटिवसाठी नव्याने निर्धार

  1. अतिशय चांगला प्रयत्न तुमच्या शुभकारयाला शुभेच्छा

Comments are closed.