बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यातील चारचाकी वाहनांच्या ड्रायव्हिंग टेस्टची जागा बदलली!

पुणे | चारचाकी वाहनांच्या टेस्टसाठी मर्यादित कोट्यामुळे नागरिकांना वेटिंगचा सामना करावा लागत आहे.  नागरिकांची होणारी ही गैरसोय टाळण्यासाठी आळंदी रस्ता येथे ड्रायव्हिंग टेस्ट घेण्याचा निर्णय घेतला गेल्याचं, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी स्पष्ट केलं आहे.

चारचाकी वाहनांच्या परवान्यासाठी ‘इन्सिट्यूट आफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्च’ येथे मर्यादित कोटा असल्यानं, नागरिकांची होणारी ही गैरसोय दूर करण्यासाठी आता परिवहन विभागाने ‘आरटीओ’ च्या आळंदी रस्ता येथील कार्यालयात पुर्वीप्रमाणेच परवान्यासाठी ड्रायव्हिंग टेस्ट घेण्याचा निर्णय घेतला गेल्याचं, भोर यांनी सांगितलं आहे.

चारचाकी शिकाऊ परवाना काढल्यावर एक महिन्यानंतर संबंधिताला पक्या परवान्यासाठी अर्ज करता येतो. मात्र संबंधिताला शिकाऊ परवान्याची वैधता संपवण्यापुर्वीची अपाॅइंटमेंट मिळत नाही. त्यामुळे परत शिकाऊ परवान्याचे नूतनीकरण करावं लागतं.

दरम्यान, हे सर्व थांबवण्यासाठी ‘आरटीओ’ आणि ‘आयडीटीआर’ येथील कोट्यामध्ये सातत्याने वाढ केली. मात्र त्या कोट्यामध्ये जास्त वाढ करणं आता शक्य नाही. हा कोटा कमी करण्यासाठी आळंदी रस्ता येथे ड्रायव्हिंग टेस्ट घेण्याच्या प्रस्तावास परिवहन आयुक्तालयाकडून मान्यता देण्यात आली आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More