पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूकी संदर्भात मोठा निर्णय!

Pune Ganpati l देशभरात पुण्याचे गणपती प्रसिद्ध आहेत. पुण्यातील गणपती उत्सवाला देशभरातून भाविक भक्त दर्शनाला येत असतात. तसेच पुण्यातील गणपती बाप्पाचा विसर्जन सोहळा देखील फारच आकर्षक असतो. पुणेकर मोठं मोठ्या ढोल ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप देतात. अशातच आता पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. श्रीमंत दगडूशेठ गणपती मंडळाने विसर्जन सोहळा वेळेत होण्यासाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

हिमालयातील जटोली शिवमंदिरची प्रतिकृती साकारणार :

मागील वर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील दुपारी 4 वाजताच विसर्जन मिरवणुक होणार आहे. त्यामुळे दगडूशेठ गणपती ट्रस्टचा हा निर्णय यापुढे देखील कायम राहणार आहे असे मंडळाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले आहे. तसेच दगडूशेठ मंडळाच्या या निर्णयामुळे यंदा देखील पुण्यातील विसर्जन मिरवणूका लवकरच संपणार आहेत.

यंदाच्या वर्षी देखील मंडळातर्फे हिमालयातील जटोली शिवमंदिरची प्रतिकृती देखील साकारण्यात येत आहे. त्या मंदिरात कर्नाटकातील श्री दत्त संप्रदायाचे ज्ञानराज महाराज माणिक प्रभू यांच्या हस्ते गणेश चतुर्थीला सकाळी 11:11 मिनिटांनी प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे.

Pune Ganpati l 24 तास दर्शनाची सोय उपलब्ध होणार? :

दगडूशेठ गणपती मंडळाचा देखावा हा 24 तास सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. तसेच बाप्पाची मिरवणूक देखील सकाळी साडेआठ वाजता मुख्य मंदिरापासून निघणार आहे. त्यामुळे आगमनासाठी सिंह रथ तयार करण्यात येत आहे.

दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील ऋषिपंचमीनिमित्त गणपती बाप्पासमोर तब्ब्ल 31 हजार महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण होणार आहे. त्यामुळे गणेशोत्सव काळात गणेश भक्तांसाठी तब्ब्ल 50 कोटींचा विमा मंडळातर्फे उतरवण्यात येणार आहे. याशिवाय मांडव परिसरात देखील 150 CCTV कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. याशिवाय मांडवापर्यंत पोहोचू न शकणाऱ्या गणेश भक्तांसाठी देखील विविध ठिकाणी चार मोठ्या एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहेत.

News Tite : Pune Ganpati 2024

महत्त्वाच्या बातम्या-

‘या’ लाडक्या बहिणींना 4500 रुपये मिळणार? जाणून घ्या लाभ कसा मिळतोय?

गणपती बाप्पा संदर्भात महत्वाची बातमी; थेट होणार पोलिसांची कारवाई

देशात ‘हा’ आजार घालतोय धुमाकूळ; WHO ने दिला इशारा

“हार्दिक पांड्यावर माझं प्रेम, तो माझा..”; प्रसिद्ध अभिनेत्रीचा मोठा खुलासा

आयफोनला विसरा! 108MP कॅमेरा असलेला भन्नाट फोन लाँच; किंमत फक्त…