Top News पुणे

पुण्यातील बेपत्ता व्यावसायिक गौतम पाषाणकर यांची सुसाईड नोट सापडल्याने खळबळ!

पुणे | पुण्यातील आटोमोबाईल्सचे व्यवस्थापकीय संचालक तसेच बांधकाम व्यावसायिक गौतम पाषाणकर हे बुधवारपासून बेपत्ता आहेत. पोलीस त्यांचा तपास करत असून आता गौतम यांची सुसाईड नोट सापडल्याने एकच खळबळ माजली आहे.

कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गौतम याचा शोध सुरु केला होता. तपास सुरू असताना गौतम पाषाणकर यांची सुसाईड नोट सापडली आहे. सुसाईड नोटमध्ये व्यवसायातील आर्थिक नुकसानामुळे आत्महत्या करत असल्याचं गौतम यांनी लिहिलंय.

गौतम पाषाणकर हे बुधवारी सायंकाळी मॉडेल कॉलनी या भागातून बेपत्ता असल्याची माहिती आहे. गौतम बुधवारी दुपारी लोणी काळभोर इथल्या त्यांच्या गॅस एजन्सीत गेले होते. त्यानंतर ते त्यांच्या ऑफीसमध्ये पोहचले. ड्रायव्हरला एका कामासाठी जाण्यास सांगून ते गणेशखिंड रस्त्यावरील एलआसी ऑफीसपर्यंत गेले.

ड्रायव्हरच्या सांगण्यानुसार त्यानंतर त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यांच्याशी संपर्क न झाल्याने ड्रायव्हरने त्यांच्या मुलाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर कुटुंबियांनी पोलिसांत धाव घेतली.

महत्वाच्या बातम्या-

मुंबई- सिटी सेंटर मॉलमध्ये अग्नितांडव, 11 तासांपासून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु

विनयभंगाच्या तक्रारीतून खडसे अजून सुटलेले नाहीत- अंजली दमानिया

पक्ष सोडण्याची वेळ का आली याचं खडसेंनी आत्मचिंतन करावं; गिरीश महाजनांचा टोला

कोरोना लशीच्या निर्मितीसाठी भारताची तयारी सुरु; केंद्राकडून ‘इतक्या’ कोटींची तरतूद

…म्हणून मला नाईलाजाने फडणवीसांचं नाव घ्यायला लागलं -एकनाथ खडसे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या