पुण्याला मिळाला लसींचा मोठा साठा; उद्यापासून सुरू होणार 45 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण
पुणे | पुण्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर लसीकरण मोहीम आहे मोठ्या प्रमाणात सुरू होती. पण लसींअभावी गेल्या दोन दिवसांपासून 45 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण बंद करण्यात आल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली होती.
दरम्यान, महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्विट करून 45 वर्षांच्यावरील नागरिकांचं लसीकरण लसींचा पुरवठा होईपर्यंत बंद असणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानुसार गेल्या दोन दिवसांपासून लसीकरण थांबवण्यात आलं होतं.
पुणे शहराला आज तब्बल 30 हजार कोरोना लसी मिळाल्या असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे उद्यापासून 45 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला ठराविक केंद्रावर सुरुवात करण्यात येणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आता लसीकरण मोहिमेला पुन्हा एकदा वेग येणार असल्याचं दिसून येत आहे.
पुण्यातील रुग्णसंख्या गेल्या दोन दिवसांपासून दिलासादायक असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर लसींचा मोठा साठा प्राप्त झाल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक लसीकरण करून घेतील आणि कोरोनाचा धोका हळूहळू कमी होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
थोडक्यात बातम्या –
पोलिसांना माणुसकी आली अंगलट; रोजा सोडण्यासाठी आरोपीला सोडलं अन्…
“या महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणाचा नियोजित पद्धतीने खून केला”
“मराठा आरक्षणाला राज्य सरकारचा निष्काळजीपणा कारणीभूत”
“पंतप्रधान कार्यालय निरुपयोगी, कोरोना लढ्याची जबाबदारी गडकरींकडे सोपवा”
भारतीय संविधान आणि सर्वोच्च न्यायालयाने आज गुणवंतांना न्याय दिला – ॲड. गुणरत्न सदावर्ते
Comments are closed.