पाण्यावरुन राजकारण करणाऱ्यांनो पुणेकर तुम्हाला नक्कीच पाण्यात बुडवणार- गिरीश बापट

पुणे | पाण्यावरुन जे राजकारण करत आहेत त्यांना पुणेकर पाण्यात बुडवल्याशिवाय राहणार नाहीत, असं म्हणत पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. ते पुण्यात बोलत होते.

गिरीश बापट यांच्या चुकीच्या नियोजनामुळेच पुण्यावर पाणी कपातीचे संकट ओढवले आहे. तसेच मतदान झालं की पाणीकपात लागू होईल, असा आरोप काँग्रेसने केला होता.

पुणेकरांनी पाण्याची चिंता करु नये. पुण्याला पाणी कमी पडू देणार नाही, असं बापट म्हणाले आहेत.

दरम्यान, पुणे लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे गिरीश बापट आणि महाआघाडीचे मोहन जोशी आमनेसामने आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

-अमरावतीत शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे!

पुण्याला ‘योग सिटी’ अशी ओळख मिळवून देणार; गिरीश बापटांची ग्वाही

-…म्हणजे कळेल तुम्ही कोणामुळे निवडून आलात; उदयनराजेंचा चंद्रकांत दादांना टोला

‘यापुढे असं बोलायचं नाही’; भरसभेत शरद पवारांची अमरसिंह पंडितांना ताकीद

-प्रणिती शिंदेचा थेट प्रकाश आंबेडकरांवर हल्लाबोल!