Pune News l गेल्या कित्येक दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढतच चाललं आहे. अशातच पुण्यात पुन्हा एकदा धक्कादायक घटना घडली आहे. पुणे शहरातील हडपसर परिसरात एका पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेलेल्या तरुणांनी रांगेत उभं न राहता आधी मला पेट्रोल भरू दे असं म्हणत मारहाण केल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे सर्वच पुणेकरांना धक्का बसला आहे.
पुण्यात पेट्रोल पंपावर घडली धक्कादायक घटना :
मिळालेल्या माहितीनुसार, काल दुपारी पुण्यातील हडपसर परिसरात एका पेट्रोल पंपावर एक तरुण त्याच्या दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी रांगेत उभा राहिला होता. दरम्यान, त्याच ठिकाणी 2 तरुण आले होते. ते तरुण दुचाकी घेऊन त्या तरुणाच्या पाठीमागे येऊन न थांबण्याऐवजी त्यांनी त्याला आधी मला पेट्रोल भरू दे अशी दादागिरी पंपावर केली. ते तरुण एवढ्यावरच न थांबता त्या तरुणांनी त्याची कॉलर पकडत त्याला मारहाण केली.
या घटनेमुळे पेट्रोल पंपावर दहशत पसरली होती. ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. या घटनेमध्ये नितेश गुप्ता हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. तर गेल्या काही दिवसांपासून पुण्यात मोठ्या प्रमाणावर अशा दहशती घडत असल्याचं दिसून येत आहे.
Pune News l पुण्यात क्राईम घटनांमध्ये दिवसेंदिवस होतेय वाढ :
या धक्कादायक घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ देखील समोर आला आहे. या घटनेमुळे पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच प्रशासन देखील अलर्ट मोडवर आले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी देखील पुण्यात अशीच एक धक्कादायक घटना घडली होती.
कोयता गँगच्या टोळक्याने कॅम्प परिसरात एका वाईन शॉपची तोडफोड केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे शहरातील कॅम्प परिसरात रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
News Title- Pune Crime News
महत्वाच्या बातम्या-
स्वातंत्र्यदिनी ‘हे’ ब्लॉकबस्टर चित्रपट पाहून आजचा खास दिवस करा साजरा!
बांग्लादेशातील हिंदुंबद्दल नरेंद्र मोदींचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
स्वातंत्र्यदिनी आनंदवार्ता! सोन्याचे भाव उतरले, जाणून घ्या किमती
“अगोदर दहशतवादी हल्ले करून निघून जायचे, आता थेट सर्जिकल स्ट्राईक होतो”
लाल किल्ल्यावरून PM मोदींची देशभरातील युवकांसाठी मोठी घोषणा; म्हणाले..