पुणे| सध्या पुण्यात कोरोना विषाणू थैमान घालत आहे याच पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या विभागीय आयुक्तांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी कोरोनापासून वाचण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी हे सांगितलं.
खोकताना रुमाल तोंडासमोर घेवून खोकावे असं आवाहन पुण्याच्या विभागीय आयुक्तांनी केलं. जर रुमाल नसेल तर त्यावेळी आपल्या शर्टच्या भाया तोंडासमोर घेवून खोकावे. आपल्या तोंडातील ड्रॉपलेट्स आजूबाजूला जे आहेत त्यांच्यापर्यंत जाणार नाहीत याची काळजी घ्यावी, असं ते यावेळी म्हणाले.
कृपया कोणत्याही कोरोनाग्रस्त रुग्णाची ओळख एक्स्पोज करू नका अशी विनंती विभागीय आयुक्तांनी संपूर्ण मिडीयाला केली. लोकांमध्ये गैरसमज पसरवू नका असं आवाहन यावेळी त्यांनी केलं.
पिंपरी चिंचवड भागातही एक संशयित महिला आढळली आहे. ही महिला दुबईहून परतली होती. या महिलेला नायडू रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पुण्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या पाच झाली असून या सर्वांवर पुणे महापालिकेच्या नायडू रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये उपचार करण्यात येत आहेत.
ट्रेंडींग बातम्या-
“खातेदारांनी घाबरू नये, धोका पत्करायला भारतीय बँका जगात अव्वल”
गेल्या 20 दिवसांत चौथ्यांदा आशिष शेलार राज ठाकरेंच्या भेटीला!
महत्वाच्या बातम्या-
अखेर ज्योतिरादित्य सिंधियांनी भाजपचं उपरणं गळ्यात घातलं! मोठं बक्षिस मिळणार?
मनसेच्या वर्धापनदिनानिमित्त राज ठाकरेंचं खास ट्विट
…म्हणून शरद पवारांनी मला सुनावलं तर मी काहीच बोलणार नाही- गणेश नाईक
Comments are closed.