Pune Heatwave | गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढत असून, पुण्यात तापमान 40° सेल्सिअसच्या वर पोहोचले आहे. तर मुंबईतही उष्ण आणि दमट हवामानामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. (Pune Heatwave)
पुण्यात उष्णतेची लाट
पुण्यात उन्हाचा कडाका वाढत असून, राजगुरूनगर आणि कोरेगाव पार्क परिसरात तापमान 40° सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात पुणे जिल्ह्यात कमाल तापमान 41° सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईत उष्ण आणि दमट हवामान कायम
मुंबईत कमाल तापमान स्थिर असले तरी उष्णता आणि आर्द्रतेमुळे उकाड्याचा त्रास वाढला आहे. शुक्रवारी कुलाबा येथे 33° सेल्सिअस तर सांताक्रूझ येथे 34.5° सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.
पुढील काही दिवस तापमान स्थिर राहणार असले तरी दमट हवामानामुळे मुंबईकरांना उष्णतेचा सामना करावा लागणार आहे.
उष्णतेपासून बचावासाठी काय करावे?
- भर दुपारी घराबाहेर पडण्याचे टाळा.
- पुरेसे पाणी आणि द्रव पदार्थांचे सेवन करा.
- हलके आणि सुती कपडे परिधान करा. (Pune Heatwave)
- उन्हात फिरताना टोपी किंवा छत्रीचा वापर करा.
Title : Pune Heatwave alert