मुंबई | पुणेकरांना मुख्यमंत्र्यांनी हेल्मेटसक्तीपासून दिलासा दिल्याची चर्चा होती, मात्र ही चर्चा फोल ठरली आहे. फक्त रस्त्यावर दंडवसुली होणार नाही हीच काय ती पुणेकरांसाठी दिलास्याची गोष्ट आहे.
हेल्मेटसक्ती मागे घ्या या मागणीसाठी पुण्यातील आमदारांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलं होतं. त्यांना मुख्यमंत्र्यांनी हेल्मेटसक्ती मागे घेण्याचं आश्वासन दिलं नाही.
हेल्मेटसक्ती कायम आहे. फक्त आता रस्त्यावर दंडवसुली होणार नाही. जे हेल्मेट घालणार नाहीत त्यांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद करुन त्यांच्या घरी दंड पाठवला जाणार आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
दरम्यान, हेल्मेटसक्तीमुळे रस्त्यावर उभे राहून पोलीस दंड वसूल करत होते, हे चित्र मात्र यापुढे दिसणार नाही.
महत्वाच्या बातम्या
-वाढत्या बेरोजगारीने तरूणाई त्रस्त; राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे रेल रोको आंदोलन
-धनंजय मुंडे अज्ञानी.. म्हणून तर त्यांनी असा प्रश्न उपस्थित केला; चंद्रकांत पाटलांची टीका
-राष्ट्रवादी-अभाविपचे कार्यकर्ते भिडले; पुणे विद्यापिठाच्या नाशिक कार्यालयात धुमाकूळ
-वंदे मातरम इस्लामविरोधी आहे, आम्ही म्हणणार नाही- सपा खासदार
-निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारचं तरूणांना मोठं आश्वासन
Comments are closed.