Pune Hit And Run Case | कल्याणीनगर अपघात प्रकरणी रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. कल्याणीनगर कार दुर्घटनेतील अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आल्याचं तपासात समोर आलं आहे. सुरुवातीला पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस आणि प्रत्यक्षदर्शींना ‘मॅनेज’ करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय.
डॉक्टरनेच दिला ‘तो’ धक्कादायक सल्ला
ससून रुग्णालयातील डॉक्टरांना पैसे देऊन थेट रक्ताचे नमुने बदलून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डॉक्टरांनीच रक्ताचे नमुने बदलण्याचा सल्ला दिल्याचं समोर आलं आहे. कल्याणीनगर अपघातप्रकरणी पोलिसांकडून तपास अधिक वेगानं करण्यात येत आहे. या प्रकरणी ब्लड सॅम्पलमध्ये बदल केल्याप्रकरणी डॉ. तावरे आणि डॉ. हळनोर यांना अटक करण्यात आलीये.
ससून रुग्णालयातील फॉरेन्सीक विभागाचे प्रमुख डॉ अजय तावरे आणि डॉ श्रीहरी हळनोर या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी रात्री उशीरा अटक केली. डॉ अजय तावरे हे ससूनमध्ये फॉरेन्सीक लॅबचे प्रमुख आहेत.
अजय तावरे यांचे वकील जितेंद्र सावंत यांनीदेखील माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “ब्लड सॅम्पलममध्ये छेडछाड केली हा आरोप आहे. आरोपी त्यावेळी सुट्टीवर होते. त्यामुळे त्यांचा या आरोपात सहभाग नव्हता. जी कलम लावण्यात आली आहेत, ते बेलेबल होती. पोलिसांकडून जाणूनबुजून कलमे लावण्यात आली आहेत. अजय तावरे हे 20 दिवसांपासून सुट्टीवर होते. लोकसेवकाच्या सांगण्यावरून ब्लड सॅम्पलमध्ये बदल केला असा आरोप पोलिसांचा होता”, अशी प्रतिक्रिया अजय तावरे यांच्या वकिलांनी दिली.
Pune Hit And Run Case | डॉ अजय तावरेंचा इशारा
डॉ अजय तावरे यांच्या फोनकॉलनंतरच आरोपीचा ब्लड रिपोर्ट बदलण्यात आल्याचं तपासात समोर आलेय. पोलिस चौकशीदरम्यान अजय तावरे यांनी मी गप्प बसणार नाही, सगळ्यांची नावं उघड करेन, असा गर्भित इशाराच दिलाय.
तावरेच्या या इशाऱ्यानंतर पुण्यातील वातावरण तापलेय. डॉ. तावरे कोणाची नावे घेणार याकडे लक्ष लागले आहे. तावरेनी दिलेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी अतुल घटककांबळे नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे
महत्त्वाच्या बातम्या-
लेकाला वाचवण्यासाठी विशाल अग्रवालने डॉक्टरला… कल्याणीनगर अपघात प्रकरणी नवी माहिती उघड
प्रियंका-निकच्या वयाबद्दल प्रियंकाच्या आईने केलं मोठं वक्तव्य, म्हणाल्या…
पुणे अपघात प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा पोलिसांना नवा आदेश; मंत्री-आमदार-खासदार सगळेच अडचणीत!
…म्हणून अभिनेता इम्रान खानने केला घटस्फोट; तब्बल 5 वर्षांनी केला खुलासा
मलायकाने भररस्त्यात केलं असं काही की… व्हिडीओ तूफान व्हायरल