Pune Hit and Run | पुण्यामध्ये पुन्हा एक हिट अँड रनची घटना घडली आहे. पिंपरी- चिंचवडमध्ये ही घटना घडली आहे. पिंपळे गुरव पोलीस चौकीच्या समोरच हा अपघात झाला आहे. एका कार चालकाने दुचाकीसह चालकाला काही फूट अंतरावर फरपटत नेल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या महितीनुसार, हा अपघात 7 ऑगस्टरोजी (Pune Hit and Run) घडला आहे.
या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे. घटनेच्या दोन दिवसांनंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कार आणि चालकाला ताब्यात घेतलं आहे. पिंपळे गुरव मेन बस स्टॉप येथे हिट अँड रनची घटना घडली आहे.
पिंपळे गुरव पोलीस चौकीच्या समोरच घडला अपघात
भरधाव चारचाकीने दुचाकीस्वारास फरफटत नेल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. जेव्हा कारचालक दुचाकीसह चालकाला फरफटत नेत होता तेव्हा आजुबाजूचे लोक कार चालकाला थांबवण्याचा प्रयत्न करत असल्याचं व्हिडिओतून दिसून येतंय.
काही प्रत्यक्षदर्शीनी तर कार चालक हा मद्यधुंद असल्याचा देखील आरोप केला आहे. या घटनेतील तरुण हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा थरारक व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. या व्हिडिओनंतर आता अनेक जण संताप व्यक्त करत आहेत.(Pune Hit and Run)
पिंपळे गुरव पोलीस चौकीच्या समोरच हा अपघात झाला आहे. कारचालकाने दुचाकीसह चालकाला काही फूट अंतरावर फरपटत नेल्याची घटना समोर आली आहे.
#Punehitandrun #Hitandrun #punenews #accident pic.twitter.com/SFTEr1VpwF— Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) August 9, 2024
घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल
काही दिवसांपूर्वीच पुण्यात असाच एक हिट अँड रनचा प्रकार घडला होता. पुण्यातील कल्याणीनगर भागात रात्री उशिरा हा अपघात घडला होता. पुण्यातील बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत कार चालवून एका दुचाकीला धडक दिली होती. या घटनेत तरुण आणि तरुणी जागीच ठार झाले होते.
हा अपघात इतका भीषण होता, की दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. हे प्रकरण संपूर्ण देशभरात गाजलं होतं. या अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी तेव्हा त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी अनेक प्रयत्न केले होते. पुणे पोलिसांवर देखील तेव्हा अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.अशात आता ही नवी घटना चर्चेत आली आहे. (Pune Hit and Run)
News Title- Pune Hit and Run in front of police station
महत्वाच्या बातम्या-
ठाकरेंच्या उमेदवाराची करामत!, विनेश फोगाटला निकालाआधीच दिलं सिल्व्हर मेडल
पुणे ते बीड 250 किलोमीटर, बजरंग सोनवणेंनी संसदेत बोलताना सांगितलं 500 किलोमीटर!
पोस्टाच्या ‘या’ योजनेत मिळतंय बक्कळ व्याज; महिन्याला कमवा 10 हजार रुपये
मोठी बातमी! अमोल कोल्हे आणि जयंत पाटील यांचा आपघात?, नक्की काय घडलं?
निवडणुकीपूर्वी महायुतीला धक्का बसणार? ‘या’ मित्रपक्षाने दिला वेगळा होण्याचा अल्टिमेटम