Pune Hit and Run l महाराष्ट्रात हिट अँड रनच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. पुण्यातील कल्याणीनगर पोर्शे कार अपघाताच्या घटनेनंतर आता पुन्हा एकदा पुण्यात हृदयद्रावक प्रकार घडला आहे. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर बापोडीजवळ अज्ञात वाहनाने भरधाव वेगाने दोन पोलिसांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर पुन्हाचं एकच खळबळ उडाली आहे.
पुण्यात घडला धक्कादायक प्रकार :
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, पुण्यातील बापोडीजवळ वाड्यांत तरुणाने दोन पोलिसांना चिरडले आहे. या अपघातात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर यामध्ये दुसरा पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
जुना पुणे-मुंबई महामार्गावरील हॅरिस पुलाखाली पहाटे 2 वाजता हा अपघात झाला आहे. खडकी पोलीस ठाण्यात बीट मार्शल म्हणून कार्यरत असलेले दोन पोलीस हवालदार त्यांच्या दुचाकीवरून रात्रीच्या गस्तीसाठी जात असताना त्यांना भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी वाहनाने धडक दिली. यादरम्यान कॉन्स्टेबल समाधान कोळी यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर चालक वाहनासह पळून गेला आहे.
Pune Hit and Run l आरोपीचा शोध पोलीस करत आहेत :
अपघातानंतर स्थानिक लोकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमी पोलीस शिपाई शिंदे यांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. समाधान कोळी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी दवाखान्यात पाठवण्यात आला आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, समाधान कोळी असं मृत पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. तर, पी. सी. शिंदे असं जखमी पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. अपघाती पोलीस कर्मचाऱ्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. यासंदर्भात खडकी पोलीस त्या तरुणाचा शोध घेत आहेत.
News Title : Pune Hit and Run two policeman killed
महत्वाच्या बातम्या-
आज राज्यात कसं असणार हवामान? ‘या’ भागाला यलो अलर्ट
या राशीच्या व्यक्तींनी नात्यात दुरावा येणार नाही याची काळजी घ्यावी
पावसाच्या पार्श्वभूमीवर ‘या’ भागातील सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
दुःखद! ऑस्कर विजेत्यानं घेतला जगाचा निरोप
पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचे! ‘या’ भागांना ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी