एक लाखात काय होणार?; होर्डिंग दुर्घटनेतील रिक्षाचालकाच्या पत्नीने मदत नाकारली!

पुणे | होर्डिंग दुर्घटनेतील जखमी रिक्षाचालक उमेश मोरे यांच्या पत्नीने रेल्वेकडून देण्यात येणारी 1 लाख रुपयांची मदत नाकारली आहे. 1 लाखात काय होणार? असा सवाल त्यांनी विचारला आहे. 

जुन्या बाजार चौकात होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत 4 जणांना प्राण गमवावे लागले होते. तर अनेकजण जखमी झाले आहेत. रिक्षाचालक उमेश मोरे यांच्या डोक्याला याच दुर्घटनेत जबर मार लागला आहे. 

उमेश मोरे घरात एकटेच कमावते आहेत. त्यांच्यावर सध्या ससून रुग्णालयात उपचार सुरु असून ते भविष्यात रिक्षा चालवू शकतील की नाही याची शाश्वती नाही. 

रेल्वेने आम्हाला 1 लाख रुपयांची मदत देऊ केलीय, मात्र हे पैसे यांच्या उपचारासाठी पुरणार नाहीत, असं सांगत सुवर्णा मोरे यांनी ही मदत नाकारली आहे. त्यांनी नुकसान भरपाई मिळण्यासाठी कायदेशीर लढाई करण्याचा निर्णय घेतलाय. 

महत्त्वाच्या बातम्या-

-आजी-माजी आमदारांसाठी खूशखबर! ‘एसटी’च्या सर्व गाड्यांमधून प्रवास मोफत

-पवार घराण्यातून फक्त या व्यक्तीलाच मिळणार लोकसभेचं तिकीट!

-परप्रांतीयांमध्ये गुजरात्यांची दहशत; 50 हजारहून अधिक परप्रांतीयांचे पलायन

-उत्तर भारतीयांनी काम बंद केल्यामुळे मुंबई बंद पडणार नाही!

-आम्ही देवेंद्र फडणवीस यांना राजकारणात आणलं- नितीन गडकरी

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या