पुणे दुर्घटना : खालून होर्डिंग कापणाऱ्या रेल्वेच्या 2 कर्मचाऱ्यांना अटक

पुणे | जुना बाजारात होर्डिंग कोसळ्यानं मोठी दुर्घटना झाली होती. या दुर्घटनेप्रकरणी खालून होर्डिंग कापणाऱ्या दोघांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. 

संजय सिंग आणि पांडुरंग वनारे अशी या दोघांची नावं आहेत. संजय सिंग हा रेल्वेमध्ये सेक्शन इंजिनिअर पदावर आहे, तर पांडुरंग वनारे हा रेल्वेमध्ये लोहार काम करतो. 

होर्डिंग वरुन कापत येण्यासाठी ते थेट खालून कापण्यात आलं. भार सहन न झाल्यानं ते रस्त्याच्या बाजूला कललं आणि कोसळलं. 

काल झालेल्या या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झालाय तर 8 जण गंभीर जखमी झालेत. 5 रिक्ष, एक कार आणि काही दुचाकी गाड्यांचं यामध्ये नुकसान झालंय. 

महत्त्वाच्या बातम्या-

-इंधन दरवाढही ठरलं ‘गाजर’; पेट्रोलचे भाव पुन्हा वाढले

-नरेंद्र मोदी एकटा जीव सदाशिव आणि आमचा झालाय पांडू हवालदार!

-…तर मी देशाचा पंतप्रधान होऊ शकतो- राहुल गांधी

-निवडणुका जिंकण्यासाठी भाजपची मोठी खेळी; ‘स्टार’ उमेदवार मैदानात

-मुख्यमंत्र्यांनी ‘या’ कारणावरून भाजपच्या मंत्र्यांना झापलं

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या